सेलू :
Accident near Ramana Phata नागपूरहून वर्धेकडे जात असलेली कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित होऊन रस्ता दुभाजकावर धडकली आणि उलटली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज रविवार १४ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील रमणा फाट्याजवळ घडली.
या अपघातात वेदांत फासगे (२१), आशिष सिंदे ( ४०) आणि तेजस फासगे (२८) सर्व रा. वर्धा हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच रुग्णमित्र प्रज्वल लटारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना आपल्या रुग्णवाहिकेद्वारे सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-३२-सी-२८२७ क्रमांकाची कार नागपूरहून वर्धेकडे जात होती. सेलूजवळील रमणा फाट्याजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्ता दुभाजकावर धडकून उलटली. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या.