देव, देश आणि धर्मासाठी बजरंग दलात सामील व्हा

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
प्रखंड स्तरावर भेटी व नवीन उपक्रमांना प्रारंभ
 
वर्धा, 
Bajrang Dal बजरंग दलाच्या वतीने जिथे गाव तिथे शाखा हा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यासाठी प्रखंडाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या. या भेटीदरम्यान संघटन विस्तार, युवकांना जोडणे तसेच हिंदू समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणार्‍या नवीन उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी समर्पित भावनेने कार्य करणार्‍या बजरंग दलाच्या माध्यमातून समाजसेवा, गौसंरक्षण, धर्मजागरण, संस्कारवर्ग आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
 
 
bajarang
 
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हिंदू समाजाची एकजूट अधिक बळकट करण्याचा संकल्प केला. तसेच आगामी कार्यक्रम आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले. या उपक्रमांचा सेलू प्रखंड हिंगणी, सिंधी रेल्वे, हिंगणघाट, वडनेर, अल्लीपूर या चार प्रखंडातून झाला. सेवा, सुरक्षा आणि संस्कार या त्रिसूत्रावर प्रेरित होऊन अधिकाधिक युवकांनी बजरंग दलात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक महेश राऊत, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक प्रशांत यादव, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक अमोल आतकर, बजरंग दल नगर सहसंयोजक निखिल मसराम, कार्यकर्ता दिलीप कुडमेठे आदींची उपस्थिती होती.