ब्राझिलिया,
bungee-jumping-accident : ब्राझीलमध्ये बंजी जंपिंगदरम्यान घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी घटनेत २१ वर्षीय मारिया एडुआर्डा या तरुणीचा मृत्यू झाला आहे. साहसी खेळाचा थरार काही क्षणांतच शोकांतिकेत बदलला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बंजी जंपिंग करताना आवश्यक असलेला सुरक्षा दोर योग्य प्रकारे जोडला न गेल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उडी घेतल्यानंतर तरुणी थेट खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर उपस्थितांमध्ये भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

सौजन्य: सोशल मीडिया प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आयोजकांकडून मोठी निष्काळजीपणा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राथमिक चौकशीनंतर काही जणांना ताब्यात घेण्यात आले असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे साहसी खेळांमधील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका क्षणातील चूक जीवघेणी ठरू शकते, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.