प्रफुल्ल गुडधे हे स्वतःचे आणि काँग्रेसचे दुकान बंद करणार

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Corporator Jitendra (Bunty) Kukde नवनियुक्त शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे हे कर्तृत्वशून्य काँग्रेस नेते असून आगामी दिवसात त्यांच्या दुटप्पी राजकारणाची आणि अपयशी नेतृत्वाची पोलखोल भारतीय जनता पक्ष जनतेसमोर करणार आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत त्यांना पहिला राजकीय दणका देण्यासाठी भाजपा सज्ज झाला आहे. प्रफुल्ल गुडधे हे आपल्या विकृत वागणुकीने नागपूर शहरातून स्वतःचे आणि काँग्रेसचे दुकान बंद करणार असल्याचा विश्वास भाजपाचे माजी शहर प्रमुख व नगरसेवक जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
 
 
bandi dksl
 
बंटी कुकडे पुढे म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा कोणत्याही व्यक्ती, परिवार किंवा राजकीय वारशावर नव्हे, तर लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, समर्पण, राष्ट्रसेवा आणि जनतेच्या अढळ विश्वासावर उभा असलेला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. विकास, सुशासन, जनकल्याण आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या बळावर भाजपने जनमानसात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे.
विरोधक कितीही अपप्रचार, भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न किंवा राजकीय वल्गना करत असले तरी भारतीय जनता पक्षाची वाटचाल थांबविण्याची ताकद कोणातही नाही. जनतेच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाने आणि विकासाच्या राजकारणाच्या बळावर भारतीय जनता पक्ष भविष्यात आणखी भक्कम, सक्षम आणि अधिक व्यापक जनाधारासह पुढे जात राहील. अनेक जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे अक्षरशः कार्यालये बंद पडले असताना भाजपची दुकान बंद करण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे मानसिक असंतुलनाचे लक्षण आहे.
प्रफुल्ल गुडधे यांनी त्यांच्या पदग्रहण सोहळ्यात वडिलांनी सुरू केलेले भाजपचे दुकान आम्ही बंद करणार" असे वक्तव्य केले. मात्र भारतीय जनता पक्ष हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा परिवाराचा पक्ष नाही. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या राष्ट्रनिष्ठ नेत्यांनी जनसंघाच्या माध्यमातून 'देश प्रथम, पक्ष द्वितीय आणि मी शेवटी' हे तत्त्व देशासमोर ठेवले. त्याच विचारधारेतून भारतीय जनता पक्षाची वाटचाल होत आहे.
 
 

आज भारतीय जनता पक्ष ज्या उंचीवर पोहोचला आहे, तो कोणत्याही एका नेत्यामुळे नाही, तर लाखो कार्यकर्त्यांच्या त्याग, परिश्रम आणि समर्पणामुळे पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला 'दुकान' संबोधणे हे केवळ चुकीचेच नाही, तर पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांचा अपमान करणारे आहे. नागपूरमध्येही भारतीय जनता पक्ष आज स्वबळावर उभा आहे. त्यामागे कार्यकर्त्यांची अथक मेहनत, सामान्य जनतेचा विश्वास आणि विकासाच्या राजकारणाला मिळालेला जनाधार हेच प्रमुख कारण आहे. त्यामुळे भाजपला दुकान म्हणणाऱ्यांनी आधी भाजपच्या विचारसरणीचा आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाचा अभ्यास करावा."