‘कापूस उत्पादकता अभियान, कापूस क्रांती’

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
खरीप हंगामात योजना राबविण्यात येणार
शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

यवतमाळ,
Cotton Productivity Campaign यंदाच्या खरीप हंगामात केंद्र शासन पुरस्कृत ‘कापूस उत्पादकता अभियान, कापूस क्रांती’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रात्यक्षिके व उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये सघन कापूस लागवड प्रात्यक्षिके 4 हजार 570 हेक्टर, क्लोज स्पेसिंग प्रात्यक्षिके 7 हजार 13 हेक्टर, तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रात्यक्षिके 778 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येणार आहेत. योजनेतील लाभांचे वितरणानुसार सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 टक्के, अनुसूचित जातींसाठी 12 टक्के आणि अनुसूचित जमातींसाठी 9 टक्के असे निश्चित करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रवर्गांतील महिलांना किमान 30 टक्के लाभ देण्याची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्राधान्याने लाभ देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
 
 
kapus
 
या योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिकांसाठी लाभार्थी निवड व अंमलबजावणीचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांमार्फत प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत. यासाठी शेतकरी गटाची नोंदणी 31 मार्चपूर्वी झालेली असणे आवश्यक आहे. लाभार्थी गटांची निवड महाडीबीटी पोर्टलवर प्राप्त अर्जांच्या आधारे प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. प्रत्येक गटामध्ये कमाल 25 शेतकरी आणि एका गावात एका पिकासाठी जास्तीत जास्त दोन गट निवडले जातील. योजनेचा लाभ घेणाèया सर्व शेतकरी सभासदांकडे कृषी ओळख क्रमांक असणे बंधनकारक राहील. निवड झालेल्या गटांना शासनाने निर्धारित केलेल्या नमुन्यानुसार हमीपत्र सादर करावे लागणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले असून शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी केले.