१२ केंद्रांवरून २४०८ परीक्षार्थ्यांनी दिली परीक्षा
वर्धा,
Group B Services Combined Preliminary Examination रविवार १४ जून रोजी जिल्ह्यातील १२ केंद्रांवरून महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुत पूर्व परीक्षा शांततेत पार पडली. ही परीक्षा २ हजार ४०८ परीक्षार्थ्यांनी दिली असून ७२१ उमेदवार परीक्षेला अनुपस्थित होते.
शहरातील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालय, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, सुशिल हिंमतसिंगका विद्यालय, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, रत्नीबाई विद्यालय, केसरीमल कन्या विद्यालय, यशवंत महाविद्यालय, न्यू आर्टस्-कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, भरत ज्ञान मंदिरम् कॉन्व्हेंट अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय तर पिपरी मेघे भागातील अग्रग्रामी हायस्कूल, श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा विद्यालय या परीक्षा केद्रांवरून ३ हजार १२९ परीक्षार्थी परीक्षा देणार होते. त्यापैकी २ हजार ४०८ जणांनी ही परीक्षा दिली असून ७२१ जण परीक्षेला गैरहजर होते. ही परीक्षा पारदर्शक व्हावी याकरिता उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समादेशक, लिपीक, शिपाई असे एकूण २७६ जणांनी विशेष प्रयत्न केले.