जळगाव (जा) , तालूका प्रतिनिधी
Heavy rain आज जामोद सुनगाव परीसरात संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास जोरदार पाउस पडला . या पावसामुळे शेतकरी व नागरीकांमधे आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपासून कुवरदेव , सुनगाव , चालठाना , विश्वाई , जामोद परिसरात जोरदार वाऱ्यांसह पाउसास सुरुवात झाली . ती ७. ३० पर्यंत धोधो पाउस पडला.
सर्व शेतांमधून पाणी वाहुलागल्याने परिसरातील सर्व नाले - नद्यांना मध्यम स्वरूपाचे पुर आलेत . सध्या या भागात कपाशी लागवडीची कामे जोरात सुरु असल्याने आज आलेला भरपुर पाउस शेतकरी बांधवांना सुखावणारा झाला आहे. त्याचबरोबर जळगांव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमधे यंदाच्या पावसाळ्याचा पहिला पाउस झाला आहे. आजच्या पावसामुळे उन्हामुळे निर्माण झालेला उकाडा व उष्णता कमी होण्यास मदत होईल .