शेतकरी संघटनेचा सविनय कायदेभंग
17 जूनला तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळाव्याचे आयोजन
राळेगाव,
HTBT seeds केंद्र शासनाने यंदाही एचटीबीटी कापूस बियाण्याच्या लागवडीला परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकèयांना आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित बियाणे उपलब्ध करून देण्यात शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत बुधवार, 17 जून रोजी राळेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्याची प्रतिकात्मक लागवड करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र झोटिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2008 पासून तणनाशक प्रतिरोधक तंत्रज्ञान असलेले एचटीबीटी कापूस बियाणे शेतकèयांना उपलब्ध होण्याची अपेक्षा होती. मात्र, आजपर्यंत या तंत्रज्ञानाला मान्यता न मिळाल्याने शेतकरी नव्या कृषी तंत्रज्ञानापासून वंचित राहत आहेत.
याच्या निषेधार्थ शेतकरी संघटनेने बुधवार, 10 जून रोजी गुजरात सीमेवरील नंदुरबार येथे सविनय कायदेभंग आंदोलन करून गुजरातमधून प्रतिबंधीत एचटीबीटी बियाणे महाराष्ट्रात आणल्याचा दावा केला आहे. या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून बुधवार, 17 जून रोजी दुपारी 12 वाजता राळेगाव तालुक्यातील खडकी येथील राजेंद्र झोटिंग यांच्या शेतात ‘प्रतिबंधित बियाण्याची लागवड’ आणि ‘तंत्रज्ञान स्वातंत्र्य मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. शेतकरी संघटनेच्या मते, शेतकèयांना कोणते बियाणे वापरायचे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. शासनाने नवीन कृषी तंत्रज्ञानावर निर्बंध घालण्याऐवजी शेतकèयांना पर्याय उपलब्ध करून द्यावेत, अशी संघटनेची मागणी आहे.
या कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे नेते वामनराव चटप, अध्यक्ष ललित बहाळे, कृषी वैज्ञानिक डॉ. चारुदत्त मायी, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांच्यासह राज्यातील विविध पदाधिकारी, महिला आघाडी, युवा आघाडीचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार आहेत. प्रतिबंधित बियाण्यांच्या लागवडीच्या घोषणेमुळे कृषी क्षेत्रात पुन्हा एकदा एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या मान्यतेचा मुद्दा चर्चेत आला असून या आंदोलनाकडे राज्यभरातील शेतकèयांचे लक्ष लागले आहे.