मुंबई
Prem Bhati accident सोशल मीडियावर हॉरर आणि कॉमेडी रील्समुळे लोकप्रिय ठरलेला कल्याण येथील तरुण रील्स स्टार प्रेम भाटी याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास मोहने परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि विखुरलेली खडी यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम भाटी हा 13 जून रोजी पहाटे सुमारे 3 वाजता कल्याणच्या मोहने परिसरातून आपल्या घरी परतत होता. याच दरम्यान शिवसेना शाखेजवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे आणि बांधकामाची खडी पसरलेली होती. या असुरक्षित रस्त्यावर दुचाकी घसरल्याने त्याचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यावर जोरात आदळला.या अपघातात प्रेम भाटी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांच्या मदतीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.Prem Bhati accident प्रेम भाटी हा सोशल मीडियावर विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रिय होता. त्याचे हॉरर आणि कॉमेडी प्रकारातील रील्स प्रेक्षकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध होते. इन्स्टाग्रामवर त्याचे सुमारे 83 हजार फॉलोअर्स असून यूट्यूबवर त्याचे लाखो सबस्क्रायबर्स होते. त्याच्या अचानक निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर शोककळा पसरली आहे.दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि बांधकाम साहित्य योग्य प्रकारे न हटवल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.या घटनेनंतर रस्ते सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.