नवी दिल्ली,
nirav-modi-case : पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)घोटाळ्यातील मुख्य आरोपी हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणात एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या घोटाळ्यातील आरोपींबाबत कोणतेही पुरावे सीबीआयला न आढळ्याने न्यायालयाने सर्व आरोपींवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द केले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

नीरव मोदीवर भारतात जवळजवळ 2 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि इतर काही गुन्हेगारी खटले दाखल होते. उइख ने नीरव मोदीसह त्याच्या कंपन्या आणि इतर संचालकांविरोधातही भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 च्या कलम 13 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता सीबीआयने न्यायालयासमोर विस्तृत तपासात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत संबंधित आरोपींविरोधात कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत. परंतु सीबीआयच्या तपासानंतर भ्रष्टाचाराचे आरोप रद्द करण्यात आले असून केवळ फसवणूक आणि कटाचे आरोप त्यांच्यावर आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील पुढील सुनावणी आणि आरोप पत्रावर सामान्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. माहितीनुसार, केवळ खाजगी व्यक्तींविरोधातच आरोपपत्र सादर केले जाणार आहे. यामुळे हे प्रकरण विशेष सीबीआय न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात नसेल.
काय आहे गुन्हा?
पीनएबीचे उप-महाव्यवस्थापक अवनीश नेपालिया यांच्या तक्रारकीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये नीरव मोदी, रवी शंकर गुप्ता, विपुल अंबानी आणि फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड व फायरस्टार डायमंड्स इंटरनॅशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक, प्रवर्तक आणि कंपनी अधिकाèयांचा समावेश होता. या सर्वांवर 321.88 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला होता.