जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट... आंदोलन स्थळावरून रोखठोक भूमिका

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
पंढरपूर
manoj-jarange-patil पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीतील अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस असून, त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय घट झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. शासकीय कर्जमाफी योजनेत दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली असली, तरी त्यावरील अटींमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
 

manoj-jarange-patil  
सरकारने ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे, त्यांना आधी उर्वरित रक्कम भरावी लागेल, त्यानंतरच त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अट ठेवण्यात आली आहे. ही अट रद्द करून सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी लागू करावी, अशी रोहित पवार यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून, तिसऱ्या दिवशी त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांचा रक्तदाब आणि शुगर कमी झाली आहे.
 
 
दरम्यान, या आंदोलनाच्या manoj-jarange-patil  पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पंढरपूर येथे रोहित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राजकीय रंग न देता त्याकडे शेतकरी लढा म्हणून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. “शेतकरी वाचला नाही तर राज्य आणि देश कसा चालणार,” असा सवाल उपस्थित करत त्यांनी रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.जरांगे पाटलांनी पुढे बोलताना, आंदोलन कितीही पोटतिडकीनं केलं तरी त्याला राजकीय अर्थ लावला जातो, असे मत व्यक्त केले. तसेच जीआरमधील शब्दांच्या खेळामुळे अडचणी निर्माण होतात, हे रोहित पवार यांनी दाखवून दिल्याचेही त्यांनी नमूद केले. सरकार चर्चेसाठी बोलावत असेल तर चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, अन्नत्यागासारखे आंदोलन अत्यंत कठीण असल्याचे सांगताना जरांगे पाटलांनी स्वतःच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली. आपली हाडे ठिसूळ झाली असून, डॉक्टरांना सलाईन लावण्यासाठी नस सापडत नसल्याचा उल्लेख त्यांनी केला.रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.