बॉलर बैट्समैन भिडले... क्रिकेटच्या मैदानात हाणामारी होतांना राहिली video

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
मुंबई
Maratha Royals vs ARCS Andheri टी20 मुंबई 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्स आणि आर्क्स अंधेरी यांच्यात रंगलेली लढत प्रेक्षकांसाठी अखेरपर्यंत उत्कंठावर्धक ठरली. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या आर्क्स अंधेरीने मराठा रॉयल्सला 20 षटकांत 5 बाद 154 धावांवर रोखले आणि विजयासाठी 155 धावांचे लक्ष्य दिले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीचा संघ 20 षटकांत 8 बाद 146 धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि 8 धावांनी पराभूत झाला.
 

Maratha Royals vs ARCS Andheri 
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. लक्ष्याचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीकडून काही आक्रमक फटकेबाजी झाली, मात्र नियमित अंतराने पडणाऱ्या विकेट्समुळे त्यांच्या धावगतीवर परिणाम झाला. अखेरच्या षटकात विजयासाठी 14 धावांची गरज असताना रोहन राजे याने प्रभावी गोलंदाजी करत केवळ 5 धावा देत मराठा रॉयल्सचा विजय निश्चित केला.
 
 
राडा झाला
मराठा रॉयल्सकडून शेवटच्या षटकानंतर मैदानावर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. रोहन राजेने जर्सी काढून आनंद व्यक्त करत सहकाऱ्यांसोबत विजय साजरा केला. मात्र या जल्लोषाआधी सामन्यात तणावपूर्ण क्षणही पाहायला मिळाले, ज्यात मैदानावरील वातावरण तापले होते.आर्क्स अंधेरीकडून शेवटच्या षटकांमध्ये तुषार देशपांडे आणि गौरव जठार यांच्यात झालेल्या शाब्दिक बाचाबाचीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शिवम दुबे यांनी तत्काळ हस्तक्षेप करत प्रकरण शांत केले आणि संघातील शिस्त पुन्हा प्रस्थापित केली.धावांचा पाठलाग करताना आर्क्स अंधेरीला 18 चेंडूत 38 धावांची गरज असताना सामना निर्णायक टप्प्यात पोहोचला होता. 18 व्या षटकात तुषार देशपांडेने 13 धावा दिल्या आणि महत्त्वाची विकेट घेत सामना अधिकच रंगतदार केला. त्यानंतर 19 व्या षटकात इरफान उमेरने भेदक गोलंदाजी करत 11 धावा देत दोन फलंदाजांना माघारी पाठवले. याच षटकात गौरव जठार बाद झाल्याने सामना पूर्णपणे मराठा रॉयल्सच्या बाजूने झुकला.आर्क्स अंधेरीकडून Maratha Royals vs ARCS Andheri  अर्जुन तेंडुलकर याने सर्वाधिक लक्षवेधी कामगिरी करत 4 षटकांत 36 धावा देत 2 महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याने मधुकर यादव आणि अयाझ खान यांना बाद करत संघाला पुनरागमनाची आशा दिली. मात्र फलंदाजीत तो फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि 12 चेंडूत केवळ 2 धावा करून बाद झाला.अतिशय चुरशीच्या आणि तणावपूर्ण वातावरणात रंगलेल्या या अंतिम सामन्यात मराठा रॉयल्सने अखेर संयम आणि अचूक गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत टी20 मुंबई 2026 चे विजेतेपद आपल्या नावावर केले.