यवतमाळ,
Minister Sanjay Rathod पर्यावरण वाचवण्यासाठी व भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवणे, जमिनीत मुरवणे, हेच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाणी पातळी खाली खाली जात आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने व शासनाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. महाराष्ट्र शासनाने जलसंधारणासाठी स्वतंत्र मृद व जलसंधारण विभाग निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षांपासून या विभागामार्फत राज्यभर भरीव काम सुरू आहे. या विभागांतर्गत गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे, अशी माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
गाळ नैसर्गिक कंपोस्ट खत आहे. धरणातील गाळ काढून शेतात टाकला, तर गाळ निघाल्यामुळे धरणात अधिक पाणी साठते तर हा गाळ शेतात टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढते. तसेच पावसाचे पाणी अडवणे हे काम फक्त शासनाच नाही तर समाजाचंही आहे. प्रत्येक गावाने, प्रत्येक शेतकèयाने या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाèया वाहतुकीची अडवणूक करण्यात येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशी अडवणूक करणे योग्य नाही. ही अडवणूक होऊ नये यासाठी महसूल, गृह आणि मृद व जलसंधारण विभागाने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी, असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले आहे.
घाईने पेरणी करू नका
मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. दरवर्षी 7 जूनपर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होतो, पण यंदा निसर्गचक्र थोडे बदलले आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकèयांच्या मनात धाकधूक आहे, शेतात पेरणी रखडली आहे. ही नैसर्गिक परिस्थिती आहे, यावर आपले नियंत्रण नाही. पण धीर सोडण्याचे कारणही नाही, असा दिलासा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी शेतकèयांना दिला आहे. घाईने पेरणी करू नका, हवामान खात्याचा अंदाज पाहूनच पेरणी करा, पेरणीपूर्वी बांधबंदिस्ती, चर काढणे यांसारखी कामे करा. जमिनीत पडणारे 2-4 थेंब पाणीही अडवा, म्हणजे ओलावा जास्त दिवस टिकेल, असेही त्यांनी सांगितले.