आभाळाचा खेळ सुरूच 'चिंता वाढली'

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
मुंबई
Monsoon delay राज्यात यंदा मॉन्सूनच्या आगमनात सातत्याने विलंब होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सामान्यतः 11 जूनपर्यंत महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होतो, मात्र यंदा निर्धारित वेळ उलटून गेल्यानंतरही राज्यात पावसाची ठळक उपस्थिती दिसून आलेली नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार 15 जूनपर्यंत मॉन्सून दाखल होईल अशी अपेक्षा होती, मात्र अरबी समुद्रातील अनुकूल नसलेल्या हवामान परिस्थितीमुळे त्याची पुढील वाटचाल संथ झाली आहे.
 

Monsoon delay Maharashtra 2026, Maharashtra rainfall forecast June 
नवीन अंदाजानुसार राज्यात, विशेषतः मुंबईसह विविध भागांत, 20 जूनपर्यंत मॉन्सून पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या विलंबामागे प्रशांत महासागरातील एल निनो (El Niño) परिस्थिती सक्रिय असल्याचा परिणाम तसेच अफगाणिस्तानकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा अडथळा कारणीभूत असल्याचे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतरच मॉन्सूनची पुढील प्रगती अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
दरम्यान, पुढील चार ते Monsoon delay पाच दिवस राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकण, गोवा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पडू शकतात, मात्र सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भातही काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.तज्ज्ञांच्या मते, राज्यातील काही भागांत उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून हवामानातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांची पेरणीची कामे रखडली आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यंदा आधीच पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता, त्यातच मॉन्सूनच्या संथ प्रगतीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
राज्यातील हवामान स्थितीवर Monsoon delay प्रशासन आणि हवामान विभागाचे बारकाईने लक्ष असून परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत.