एआय आधारित निगराणीमुळे मुक्त विद्यापीठ परीक्षा पारदर्शक

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
अमरावती विभागात उन्हाळी परीक्षा सुरळीत

यवतमाळ, 
Open University Examination यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी मे-जून 2026 परीक्षा अमरावती विभागात शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कॉपीमुक्त वातावरणात यशस्वीरित्या पार पडल्या. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात प्रकुलगुरू डॉ. बिसेन, परीक्षा नियंत्रक बटुप्रसाद पाटील तसेच विभागीय संचालक तथा वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. जयंत वडते यांच्या सहकाèयाने परीक्षा व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते. अमरावती विभागातील एकूण 83 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. यंदा प्रथमच सर्व केंद्रांवर एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.
 

open uni 
 
संवेदनशील केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्येही स्वतंत्र एआय कॅमेèयांची व्यवस्था करण्यात आली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून परीक्षा काळात विविध केंद्रांवरील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले. विभागीय केंद्रातील कंट्रोल रूममधून प्राप्त होणाèया अलर्टचे सातत्याने परीक्षण करून संबंधित केंद्रांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या सूचनेनुसार विभागीय केंद्राने प्रत्येक परीक्षा केंद्राला समान संधी व समान न्याय देण्याची भूमिका स्वीकारली. केंद्र संयोजक, सहायक पर्यवेक्षक, वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक तसेच परीक्षा कार्यात सहभागी सर्व अधिकारी व कर्मचाèयांचा विश्वास संपादन करण्यात विभागीय केंद्राला यश आले. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांकडून परीक्षा प्रक्रियेला उत्स्फूर्त सहकार्य लाभले.
 
 
परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी भरारी पथकांनी सातत्याने विविध केंद्रांची तपासणी केली. त्याचबरोबर डॉ. जयंत वडते यांनी नियमित भेटी देऊन परीक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. परीक्षा कालावधीत कुलगुरू डॉ. बिसेन यांनीही नाशिकहून वाशीम जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाèयांच्या या भेटींमुळे परीक्षा यंत्रणा अधिक सतर्क राहिली. परीक्षा काळात विभागीय केंद्रातील अधिकारी व कर्मचारी कॅमेèयांद्वारे प्राप्त होणाèया प्रत्येक सूचनेवर बारकाईने लक्ष ठेवून होते. कोणतीही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित केंद्राला तत्काळ मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे परीक्षा प्रक्रियेत शिस्त, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व अधिक बळकट झाले.
 
 
विशेष म्हणजे अपवादात्मक किरकोळ घटनांचा अपवाद वगळता कुठेही गंभीर स्वरूपाचे अनुचित गैरप्रकार आढळून आले नाहीत. त्यामुळे परीक्षा विश्वासार्ह, कॉपीमुक्त आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरणात पार पडल्याचे दिसून आले. एआय आधारित निगराणी, काटेकोर नियोजन आणि सर्व घटकांच्या समन्वयामुळे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांचे तंत्रज्ञानाधारित व पारदर्शक परीक्षा व्यवस्थापनाचे व्हिजन यशस्वीपणे साकार झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
यंदाच्या उन्हाळी परीक्षांमध्ये एआय आधारित सीसीटीव्ही निगराणी प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला. सर्व परीक्षा केंद्रांवरील कॅमेरे विभागीय केंद्र व परीक्षा विभागाशी जोडण्यात आले होते. रिअल-टाईम निरीक्षण, तत्काळ सूचना आणि सतत नियंत्रण यामुळे परीक्षा व्यवस्थापन अधिक सक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक झाले. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढविण्याचा विद्यापीठाचा हा प्रयत्न सर्व स्तरांतून कौतुकास्पद ठरत आहे.