मुंबई
Munawar Faruqui सध्या सोशल मीडियावर गाजत असलेल्या ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादाला आता नवे वळण मिळाले असून या प्रकरणात बिग बॉस विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी याने केलेल्या उपरोधिक टिप्पणींमुळे चर्चेला अधिकच उधाण आले आहे. वादाच्या केंद्रस्थानी असलेला कॉमेडियन प्रणित मोरे हा सध्या राष्ट्रीय महिला आयोग, पोलिस तपास आणि सोशल मीडियावरील तीव्र ट्रोलिंगमुळे अडचणीत सापडला आहे.
या प्रकरणाची सुरुवात एका स्टँड-अप शोदरम्यान करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि असंवेदनशील विनोदांमुळे झाली होती. त्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला आणि प्रकरणाने कायदेशीर वळण घेतले. या पार्श्वभूमीवर मुनव्वर फारुकीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट्समुळे या वादाला आणखी धार चढली आहे.
मुनव्वरने उपरोधिक शैलीत केलेल्या पोस्टमध्ये “३७० रुपयांच्या बिर्याणी”चा उल्लेख करत संबंधित प्रकरणावर खोचक टिप्पणी केली. तसेच कॉमेडियन्सनी आपले साहित्य प्रसिद्ध करण्यापूर्वी वकिलांकडून तपासून घ्यावे, असा सल्लाही त्याने दिला. त्याच्या या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहींनी त्याचे समर्थन केले, तर काहींनी टीका केली आहे.याचदरम्यान, मुनव्वरने आणखी एका पोस्टमध्ये नाव न घेता अन्य काही कॉमेडियन्सवरही सूचक टोले लगावले होते. मात्र काही वेळाने संबंधित पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घडामोडींमुळे कॉमेडी विश्वात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून सोशलMunawar Faruqui मीडियावर यावरून जोरदार वाद सुरू आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून एका अन्य क्लिपमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांनंतर प्रकरण अधिक चिघळले आहे. संबंधित कलाकारांनी माफी मागितली असली तरी कायदेशीर कारवाई सुरूच असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर सेलने प्रणित मोरे, तसेच संबंधित अन्य कलाकारांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
सध्या प्रकरण तपासाधीन असून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर यावर तीव्र चर्चा सुरू आहे. कॉमेडी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जबाबदारी यामधील सीमारेषा पुन्हा एकदा अधोरेखित करणारे हे प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.