पुणे
Shahid Kapoor पुण्याच्या विमाननगर परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. बॉलिवूड कलाकार शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि कृती सॅनन यांच्या उपस्थितीमुळे मोठ्या संख्येने प्रेक्षक जमा झाले होते. मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने कार्यक्रमात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आणि अखेर आयोजकांना तो तातडीने रद्द करावा लागला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार्यक्रम कोणत्याही पास किंवा तिकीटाशिवाय सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला होता. यामुळे अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली. कार्यक्रम सुरू होताच आणि कलाकार मंचावर येताच प्रेक्षकांचा उत्साह अनावर झाला. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले.गर्दीतील काही लोकांनी बॅरिकेड्स बाजूला सारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षेसाठी तैनात असलेले बाऊन्सर्स आणि सुरक्षा कर्मचारी गर्दीसमोर अपुरे पडल्याचे चित्र निर्माण झाले. याच दरम्यान कलाकारांच्या दिशेने काही लोक धावून गेल्याचे आणि त्यामुळे मंच परिसरात धक्काबुक्की झाल्याचेही समोर आले.परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात Shahid Kapoor येताच आयोजकांनी कार्यक्रम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कलाकारांनी सुरक्षितपणे परिसरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रेक्षक त्यांच्या मागे धावत असल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.या गोंधळामुळे उपस्थित प्रेक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याचीही माहिती आहे. कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला, लहान मुले आणि तरुण उपस्थित होते. मात्र, गर्दीच्या तुलनेत सुरक्षा व्यवस्था अपुरी ठरल्याने संपूर्ण नियोजन कोलमडल्याचे चित्र दिसून आले.
दरम्यान, या घटनेनंतर आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अशा मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अधिक काटेकोर सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.