राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसची मेगा जॉब फेअर!

१५० हून अधिक कंपन्यांचा सहभाग

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
rahul-gandhi-birthday : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस आणि भारतीय युवक काँग्रेसकडून दिल्लीत मेगा जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जून रोजी नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे हा रोजगार मेळावा होणार असून देशभरातील बेरोजगार युवकांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
 
 
 
rahul-gandhi-birthday
 
या जॉब फेअरमध्ये १५० हून अधिक खासगी कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाहन उद्योग, ई-कॉमर्स, बँकिंग, ग्राहक वस्तू आणि इतर विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्या हजारो युवकांना या मेळाव्यात मुलाखती आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
 
भारतीय युवक काँग्रेसने हा उपक्रम युवकांसाठी मोठी संधी असल्याचे सांगितले आहे. वाढती बेरोजगारी आणि रोजगाराच्या मर्यादित संधी यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत युवकांना थेट रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या मेळाव्याद्वारे केला जात आहे.
 
काँग्रेस नेत्यांच्या मते, रोजगार निर्मिती हा देशासमोरील सर्वात मोठ्या प्रश्नांपैकी एक आहे. त्यामुळे केवळ राजकीय कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता युवकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.