नागपूर ,
Ramnagar Gymnasium रामनगर व्यायाम शाळेचे वरिष्ठ मल्ल तथा पश्चिम नागपूर नागरिक संघाचे कार्यकर्ते रमेश माटे (वय ७०) यांनी रायपूर (छत्तीसगड) येथे आयोजित 'मिनी इंडियाबुल्स पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप' स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत दोन सुवर्णपदके पटकावली.
या स्पर्धेत त्यांनी 'डेडलिफ्ट' आणि 'बेंच प्रेस' या दोन प्रकारांत सहभाग घेतला. डेडलिफ्टमध्ये ८०, ९० आणि १०० किलो वजन उचलण्याचे सर्व प्रयत्न यशस्वी ठरले,Ramnagar Gymnasium तर बेंच प्रेसमध्ये ६५ आणि ७० किलो वजनाचे प्रयत्नही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. सर्व प्रयत्नांना ‘गुड लिफ्ट’ मान्यता मिळाल्याने त्यांना दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांनी गौरविण्यात आले.सत्तरीतही जिद्द, सातत्य आणि कठोर मेहनतीच्या बळावर मिळविलेल्या या यशाबद्दल पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवि वाघमारे यांनी रमेश माटे यांचे अभिनंदन केले.तसेच पुढे पॅरिस येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र