रोहितची अवस्था बघून जीव तुटतोय...

आई सुनंदा पवार झाल्या भावुक

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
पंढरपूर
Sunanda Pawar शेतकऱ्यांता सातबारा कोरा करावा आणि सरसकट कर्जमाफी करावी,अशी मोठी मागणी करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरु केलं आहे. आंदोलनाच्या आज तिसऱ्या दिवशी रोहित पवारांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याचंही समजते. एका आंदोलनकर्त्याला चक्कर आल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचास सुरु असल्याचंही सांगितलं जात आहे. तसच ब्लड प्रेशर ड्रॉप होण्यास सुरुवात झाली आहे.अशातच पवार यांच्या पत्नी कुंती पवार,आई सुनंदा पवार आणि मुलगा आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.
 

Sunanda Pawar  
"आई म्हणून रोहितची अवस्था बघून जीव तुटत आहे.पण आपल्या मुलाचा एका निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांचे भले होणार असेल तर आनंद आहे.सलाईन घेण्याचा रोहितला गरज आहे.पण ,तो ऐकणार नाही.त्यामुळे विठ्ठलाकडे शेतकऱ्यांच्या झोळीत कर्जमाफीच्या निर्णयाचे सकारात्मक दान दे.झाली तेवढी परवड खूप झाली",अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी व्यक्त केली आहे.
 
 
रोहित पवारांना ओआरएस सलाईन घेण्याचा सल्ला
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, रक्तातील साखरेचेही प्रमाण कमी झाल्याने डॉक्टरांनी आमदार रोहित पवारांना ओआरएस सलाईन घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार रोहित पवारांना सलाईन लावण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं कळते. ऑक्सिजन पल्स रेट मीटर मॉनिटरही लावलं जाणार आहे. डॉक्टरांची सर्व वैद्यकीय यंत्रणा आंदोलनस्थळी सज्ज झाली आहे. ब्लड प्रेशर आणि साखर ड्रॉप होत असल्याने डॉक्टरांनी सलाईन घेण्याचा पवारांना सल्ला दिला आहे.