विठ्ठलाच्या नगरीत आंदोलनाची धार तीव्र

आंदोलनकर्त्याची तब्येत खालवली…पवारांच्या रक्तातील साखर कमी

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
पंढरपुर
Satbara Kora demand शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या साक्षीने सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे.
 

Rohit Pawar hunger strike Pandharpur, Satbara Kora demand farmers loan waiver Maharashtra, 
आंदोलनादरम्यान एका सहभागी कार्यकर्त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर स्वतः रोहित पवार यांची रक्तातील साखर कमी झाल्याची माहिती समोर आली असून, प्रकृती अस्वस्थ असूनही ते आंदोलनावर ठाम आहेत. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, कर्जमाफीतील सर्व जाचक अटी मागे घेतल्या पाहिजेत,” अशी ठाम भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली.
 
 
रोहित पवार यांनी राज्य सरकारवर Satbara Kora demand  गंभीर आरोप करत सरकार  शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा दावा केला. कृषिमंत्र्यांकडून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत ही मागणी पोहोचली असली तरी मुख्यमंत्री प्रत्यक्ष संवाद साधत नसल्याचे त्यांनी म्हटले. “मंत्री दत्तामामा भरणे यांनी चर्चा केली आहे, पण मुख्यमंत्री स्वतः पुढे येत नाहीत,” असा आरोपही त्यांनी केला.आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देत रोहित पवार यांनी जर उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास संत नामदेव पायरी परिसरात आंदोलन हलविण्यात येईल असे जाहीर केले आहे. तसेच, परिस्थिती बदलली नाही तर राज्यभर कार्यकर्ते आंदोलनात उतरतील, याची जबाबदारी प्रशासनाची असेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी त्यांनी भावनिक प्रतिक्रिया देताना “अजितदादा असते तर ते पहिल्यांदा भेटायला आले असते,” असे वक्तव्य केले.
 
 
दरम्यान, या आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया Satbara Kora demand  तीव्र झाल्या आहेत. भाजप आणि सत्ताधारी नेत्यांकडून आमदार रोहित पवार यांच्यावर टीका करण्यात आली असून मंत्री जयकुमार गोरे, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील, संजय राऊत, राजू शेट्टी, हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे यांच्यासह विविध नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देण्याची तयारी दर्शवली आहे.दरम्यान, “रक्तातील साखर कमी झाली असली तरी मी आंदोलन सहन करत आहे,” असे रोहित पवार यांनी सांगितले असून, त्यांच्या या आंदोलनाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.