Selu Nagar Panchayat शहरातील १, ११, १२ व १३ या प्रभागांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून नियमित स्वच्छता व नाली सफाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यत होत आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे अनेक भागांतील नाल्या तुंबल्या असून साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्त्यांच्या कडेला कचर्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. नाल्यांमधील गाळ काढला जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शयता व्यत केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नगरपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे. स्वच्छता कर्मचार्यांची अपुरी उपस्थिती आणि नियोजनाचा अभाव यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.