अयोध्या
ram mandir ayodhya अयोध्या राम मंदिरात अर्पण केलेल्या सात कोटी रुपयांच्या चोरीच्या दाव्याचे प्रकरण वाढत चालले आहे. मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री योगी यांच्याकडे चोरीच्या दाव्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत करण्याची मागणी केली. त्यानंतर काही तासांतच शासनाने तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटी सात दिवसांत प्राथमिक अहवाल आणि १५ दिवसांत अंतिम अहवाल सादर करेल. पुढील काळात गैरव्यवहार होऊ नये यासाठीही एसआयटी सूचना देईल.
ram mandir ayodhya दरम्यान, मंदिराचा कर्मचारी लवकुश मिश्रा (२७ ) याच्या घरातून दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याने पैसे शेणात दाबून लपवले होते. याशिवाय, काही पैसे पेटीतही ठेवले होते. मात्र, हे पैसे कोणाचे आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. लवकुशच्या वडिलांनीही पैसे मिळाल्याची पुष्टी केली आहे. सूत्रांनुसार, लवकुश मंदिरात अर्पण केलेली रक्कम मोजण्याचे काम करत होता.
ram mandir ayodhya लवकुशला त्याच्या सासऱ्याने नोकरी लावली होती. लवकुशचा मेहुणा अनुकल्प मिश्रा आधीपासूनच मंदिरात नोकरी करत होता. सूत्रांनुसार, अनुकल्प आणि लवकुश दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत.
एसआयटीमध्ये लखनौचे आयुक्त विजय विश्वास पंत (आयएएस), किरण एस. (आयपीएस, आयजी रेंज) आणि नीलरत्न (विशेष सचिव, वित्त) यांचा समावेश करण्यात आला आहे. किरण एस. हे सीबीआयमध्ये डीआयजी राहिले आहेत. म्हणजेच, वित्त आणि कायद्याच्या तज्ञांना आयुक्त मार्गदर्शन करतील.
ram mandir ayodhya विजय विश्वास पंत: आयआयटी कानपूरमधून बी.टेक उत्तीर्ण आहेत. सध्या लखनौचे मंडलायुक्त आहेत. एसआयटीचे अध्यक्षस्थान भूषवतील. देणग्या आणि देणगीच्या व्यवस्थेचे आकलन करतील. सुधारणांसाठी सूचना देतील.
किरण एस.: गुन्हेगारी तपासाचा दीर्घ अनुभव आहे. देणग्यांच्या चोरीच्या आरोपांच्या मुळाशी जातील. म्हणजेच, पोलिसांच्या दृष्टिकोनातून तपास सांभाळतील.
नीलरत्न: वित्त विभागात विशेष सचिव आहेत. ते मंदिराचे ऑडिट, देणग्या आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करून अहवाल तयार करतील.
ram mandir ayodhya गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, पथकात एकूण सहा लोक होते. त्यापैकी दोन पोलिसांच्या गणवेशात होते आणि चार साध्या कपड्यांमध्ये होते. रुपये लवकुशच्या घरातील कपाटात-पेटीत ठेवले होते, काही रुपये त्याने शेणात दाबून लपवले होते. लवकुश आधी कार मेकॅनिक होता. मंदिरात नोकरी मिळाल्यानंतर त्याची आर्थिक स्थिती वेगाने बदलली होती.
ram mandir ayodhya गावी आल्यावर तो खूप पैसे खर्च करत असे. एकदा त्याने गावकèयांना दारू पाजण्यासाठी ठेकेदाराला 50 हजार रुपये दिले होते. लवकुशचे वडील बच्चूलाल गाझियाबादच्या लोहा मंडीत काम करतात. बच्चूलाल यांना तीन मुली आणि एक मुलगा लवकुश आहे. लवकुशचे लग्न आठ वर्षांपूर्वी झाले होते. त्याला सहा वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे.