Turmeric Cultivation by Farmers यावर्षीच्या खरीप हंगामात मागील शेती पिकाची हेळसांड पाहता व मेहनतीच्या दृष्टिकोनातून शेतकरी या हंगामात सर्वाधिक हळद लागवडीकडे वळल्याचे चित्र उमरखेड परिसरात दिसून येत आहे. मागील वर्षीची हंगामाची परिस्थिती पाहता शेतकèयांनी सर्वाधिकपणे सोयाबीन पेरणीला पसंती दिली होती. परंतु यावेळी मात्र हळद लागवडीच्या दृष्टिकोनातून सर्वाधिकपणे क्षेत्र वाढीव बघावयास मिळत आहे.
खरीप हंगाम 26-27 चे लागवड व पेरणी नियोजन केले असून कापूस 13 हजार 632 हेक्टर, उपलब्ध बियाणे 60 हजार 102 पाकीट, सोयाबीन 34 हजार 200 हेक्टर असून 15 हजार क्विंटल कृषी केंद्रात तर 19 हजार 200 क्विंटल घरगुती बियाणे उपलब्ध आहे. तूर क्षेत्र 6 हजार 145 हेक्टर असून त्यासाठी 4 हजार 2 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. या सोबतच डीएपी 694 मेट्रीक टन, युरिया 789 मे. टन, सिंगल सुपर फॉस्फेट 14 हजार मे. टन, युरिया 2 हजार 50 मे. टन साठा आहे. यामुळे शेतकèयांनी खताच्या अडचणीबाबत मुळीच चिंता करण्याची गरज नाही, असे पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गुजलवार यांनी सांगितले.