नवी दिल्ली
US attack on ships ओमानच्या आखातात झालेल्या वादग्रस्त कारवाईत अमेरिकेच्या नौदलाने पलाऊ ध्वज असलेल्या आणि भारतीय खलाशी असलेल्या जहाजांसह तीन जहाजांवर हल्ला केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असून या कारवाईमुळे भारत आणि अमेरिकेमध्ये राजनैतिक तणाव निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्कराने या भागात कार्यरत असलेल्या काही जहाजांवर लक्ष्य साधत कारवाई केली. त्यामध्ये एक भारतीय जहाज तसेच पलाऊ ध्वज असलेल्या जहाजाचा समावेश होता, ज्यावर भारतीय खलाशी कार्यरत होते. या कारवाईत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर भारत सरकारने तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारच्या हल्ल्यांना कोणत्याही परिस्थितीत मान्यता देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.दरम्यान, अमेरिकेने या कारवाईचे समर्थन करत संबंधित जहाजांनी अमेरिकेच्या समुद्री नाकेबंदीचे उल्लंघन केले आणि इराणी तेलाची बेकायदेशीर वाहतूक करण्याचा प्रयत्न केला,US attack on ships असा दावा केला आहे. या जहाजांच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्या सूचनांचे पालन न झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्य उपप्रवक्ते टॉमी पीगॉट यांनी स्पष्ट केले.या घटनेनंतर भारताने अमेरिकेकडे तीव्र आक्षेप नोंदवला असून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी या प्रकरणावर चर्चा केली आहे. भारताने या हल्ल्यांचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असे ठामपणे नमूद केले आहे.दुसरीकडे, अमेरिकेकडून या कारवाईबाबत माफी मागण्यास नकार देण्यात आला असून उलटपक्षी होर्मुज खाडीतील सुरक्षा आणि शांततेसाठी सर्व जहाजांनी अमेरिकन लष्कराच्या निर्देशांचे पालन करावे, असा इशाराही देण्यात आला आहे. या भूमिकेमुळे दोन्ही देशांतील तणाव अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या प्रशासनाने इराणसोबत संभाव्य युद्धविराम कराराची शक्यता व्यक्त केली असून हा करार झाल्यानंतर होर्मुज खाडीतील समुद्री मार्ग पुन्हा पूर्णपणे खुले होतील, असा दावा करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.