३७० रुपयांच्या बिर्याणी "चांगला माणूस आहे तो"

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
Kunika Sadanand सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावरून निर्माण झालेला तणाव अद्यापही थंबलेला नाही. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वातही मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र होत असलेल्या टीकेमुळे, तसेच पोलिस आणि महिला आयोगाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनोरंजन कलाकार प्रणित मोरे अखेर माफी मागण्यास भाग पडला आहे. मात्र त्यानंतरही या वादाचे पडसाद थांबताना दिसत नाहीत.
 
Kunika Sadanand
 
या प्रकरणावर महाराष्ट्रभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना आता मनोरंजन विश्वातून एक अनपेक्षित पाठिंबा समोर आला आहे. बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमधून ओळख निर्माण केलेली ज्येष्ठ अभिनेत्री कुनिका सदानंद हिने प्रणित मोरेच्या बाजूने भूमिका घेत त्याला सार्वजनिकरित्या धीर दिला आहे. ‘बिग बॉस १९’मधील सह-स्पर्धक म्हणून दोघांमधील ओळख असल्याने तिच्या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.प्रणित मोरेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या माफीनाम्याच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कुनिकाने त्याला मानसिक आधार देत म्हटले की, चुका माणसाकडून घडतात, मात्र त्या जाहीरपणे मान्य करणे हे मोठ्या धाडसाचे लक्षण आहे. तिच्या मते, प्रणितने आपली चूक स्वीकारून एक सकारात्मक उदाहरण घालून दिले आहे.ती पुढे म्हणाली, "प्रणित, तू मनानं खूप चांगला आणि योग्य संस्कार असलेला मुलगा आहेस. पण मी तुला नेहमी सांगायचे की, जेव्हा तुम्ही स्टेजवर रोस्टिंग किंवा Kunika Sadanand  क्राउड वर्क करत असता, तेव्हा लोक हसतायत आणि टाळ्या वाजवतायत हे पाहून कलाकार वाहवत जातो." प्रणितने यातून धडा घेऊन पुढे यावे, अशी आशा तिने व्यक्त केली.
 
 
ती पुढे म्हणाली की, स्टेजवरील रोस्टिंग किंवा क्राउड वर्कदरम्यान कलाकार कधी कधी प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे वाहवत जातात. त्यामुळे अशा प्रसंगी योग्य मर्यादा राखणे आवश्यक असल्याचेही तिने नमूद केले. प्रणितने या घटनेतून शिक घेऊन पुढे जाणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.
कुनिकाने या वादाला केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता त्यामागील सामाजिक मानसिकतेशी जोडले. तिच्या म्हणण्यानुसार, महिलांकडे वस्तूप्रमाणे पाहण्याची विकृत दृष्टी ही समाजात दीर्घकाळ रुजलेली समस्या आहे आणि प्रणित हा त्या व्यापक मानसिकतेचा एक भाग ठरला आहे, तिचा निर्माता नाही. त्यामुळे केवळ त्यालाच संपूर्णपणे जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही, असेही तिने स्पष्ट केले.
 
 
दरम्यान, प्रणित मोरेने Kunika Sadanand  आपल्या माफीनाम्यात बोलताना सांगितले की, त्या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत त्याला खंत आहे. संबंधित प्रसंगात मंचावर झालेल्या वक्तव्याला थांबवणे हे आपले कर्तव्य होते, मात्र ते न झाल्याने ही चूक झाल्याचे त्याने मान्य केले. तसेच त्याचे इन्स्टाग्राम खाते बंद असल्यामुळे तो वेळेवर आपली भूमिका मांडू शकला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.या वादाची सुरुवात एका स्टेज शोमधील धक्कादायक विधानामुळे झाली होती. हिमांशू जांग्रा नावाच्या सहभागीने ३७० रुपयांच्या चिकन बिर्याणीचा उल्लेख करत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावर प्रणित मोरेने आक्षेप न घेता उलट हसून प्रतिसाद दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर हे प्रकरण अधिकच चिघळले आणि त्यावरून मोठा जनआक्रोश निर्माण झाला.
कुनिकाने पाठराखण केली असली तरी सोशल मीडियावर मात्र अनेकांनी आपला रोष कायम ठेवला आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन क्षेत्रातील जबाबदारी, मंचावरील भाष्याची मर्यादा आणि सामाजिक संवेदनशीलता यावर पुन्हा एकदा व्यापक चर्चा सुरू झाली आहे. परिणामी, हे प्रकरण केवळ एका कलाकारापुरते मर्यादित न राहता एक मोठा सामाजिक वाद म्हणून पुढे येताना दिसत आहे.