दर्यापूर,
shahanur-river : खाद्य व औषधी प्रशासनचे (एफडीए) मुख्य सचिव तुकाराम मुंढे यांच्या कारवाईच्या हंटर भिती ग्रामीण भागात व्यक्त होत आहे. भेसळ आणि एक्सपायरी झालेल्या खाद्यपदार्थांची कसून चौकशी सुरू असल्याने आता ग्रामीण भागातील दुकानदारांनी धास्ती पकडली आहे.
येवदा परिसरातील छोटे मोठे दुकानांमध्ये अनेक ठिकाणी चिप्सची विक्री केली जाते. परंतु, घेणार्या ग्राहक एक्सपायरी न पाहता बिनधास्त खरेदी करतात यावर अन्न व प्रशासनाचे कुठलेही लक्ष नसल्याने ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात होतो. कोणाचे भय नसल्याने मोठे व्यापारी एक्सपायरी झालेल्या मालाची सर्रास विक्री करायचे. परंतु, तुकाराम मुंढे यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने सर्वच सर्तक झाले आहे. येवदा येथील अज्ञात दुकानदाराने भीतीपोटी एक्सपायरी झालेले चिप्स पाकीट येथील शहानुर नदीच्या पात्रामध्ये फेकून दिल्याचे निदर्शनास आले. ही बाब लोकांच्या लक्षात येताच लोकांनी तर्कवितर्क लावणे सुरु केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने ग्रामीण भागात होत असलेल्या अशा प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसे अशा दुकानूनदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून होत आहे.