नवी दिल्ली
indian army गणवेशाबरोबरच नवीन नियमावलीत वैयक्तिक देखभाल आणि शिस्तीबाबतही कठोर नियम कायम ठेवण्यात आले आहेत.
1)टॅटू आणि शरीरावर पिअर्सिंग करण्यास बंदी कायम.
2)गणवेशात असताना ब्रेसलेट घालण्यास मनाई.
3)धार्मिक विधीच्या दिवशी केवळ एक पवित्र दोरा घालण्यास परवानगी.
4)धार्मिक चिन्हे आणि खुणांवर निर्बंध, मात्र शीख जवानांना अपवाद.
indian army मिशांवरही नियम
लष्कराने मिशांच्या लांबीबाबतही स्पष्ट नियम घातले आहेत.
1)मिशांची लांबी 12 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी.
2)गणवेशात असताना डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरण्यास मनाई.
3)मात्र आफ्टर-शेव्ह लोशन वापरण्याची परवानगी कायम.
indian army महिला अधिकाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे
महिला अधिकाèयांसाठीही नवीन ड्रेस कोड जारी करण्यात आला आहे.
1)साध्या रंगाच्या साड्या परिधान करण्यास परवानगी.
2)सरळ टाचांपर्यंत येणाèया पॅन्टसह कुर्ता-सलवार आणि दुपट्टा परिधान करता येईल.
3)स्लीव्हलेस कुर्ता, पॅलाझो पॅन्ट आणि सिगारेट पॅन्ट यांना परवानगी नाही.
indian army सौंदर्य प्रसाधनांवरही निर्बंध
महिला अधिकाèयांसाठी खालील वस्तूंवर गणवेशात बंदी घालण्यात आली आहे.
1)लिपस्टिक
2)रंगीत नेलपॉलिश
3)बिंदी
4)नथ
विवाहित महिलांना सिंदूर लावण्याची परवानगी असेल परंतु तो बेरेट किंवा पीक्ड कॅपखाली झाकलेला असणे आवश्यक आहे.