देशी कट्ट्यासह आरोपी जेरबंद

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
पोलिसांचा सापळा यशस्वी

वणी, 
Accused apprehended मुंगोली खाण परिसरात चोरीच्या उद्देशाने देशी कट्टा घेऊन फिरणाèया एका संशयित आरोपीला शिरपूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. आरोपीकडून गावठी बनावटीचे देशी पिस्तुल व दोन काडतुसे असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाहरुख उर्फ फावडा गुलशेर खान (वय 31, आझाद वॉर्ड, घुग्घुस) हा देशी कट्टा घेऊन चोरी करण्याच्या उद्देशाने मुंगोली खाण परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शनिवार, 13 जून रोजी रात्री शिरपूर पोलिसांनी खाण परिसरात सापळा रचला.
 
 
mungoli
 
रात्री 9.45 च्या सुमारास मुंगोली ते वर्धा नदी पुलाकडे जाणाèया मार्गावर एक संशयित इसम फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता तो घाबरल्याचे दिसून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी पिस्तुल (कट्टा) व दोन काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील देशी कट्ट्याची किंमत सुमारे 50 हजार रुपये आणि दोन काडतुसांची किंमत 2 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम 1959 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई शिरपूर पोलिस ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, इकबाल शेख, अविनाश बनकर, सुनील दुबे, पंकज कुडमेथे, दीपक वाकडे, किरण दासरवार, फुलचंद नाईक यांनी पार पाडली.