नागपूर,
bal rangbhumi parishad बालरंगभूमी ही केवळ अभिनय शिकवणारी संस्था नसून बालमनावर संस्कार करणारी एक शाळाच आहे. या माध्यमातून नवी पिढी घडविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस यांनी केले. बाल रंगभूमी परिषद, नागपूर शाखेतर्फे महिला महाविद्यालय, नंदनवन येथे आयोजित अभिनय कार्यशाळा २०२६ च्या समारोप समारंभात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सिने-नाट्य कलावंत मुकुंद वसुले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या मनोगतात मुकुंद वसुले यांनी बाल रंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करताना सांगितले की, “माझ्यासह अनेक कलावंत अशाच शिबिरांमधून घडले असून आज रंगभूमीवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यामुळे या संधीचे बालकांनी आणि त्यांच्या पालकांनी निश्चितच सोने करावे.” कार्यक्रमाच्या प्रारंभी नागपूर शाखेचे अध्यक्ष श्याम आस्करकर यांनी प्रास्ताविकातून परिषदेच्या आगामी त्रैमासिकातील विविध उपक्रम व स्पर्धांची माहिती दिली. बालरंगभूमी ही केवळ अभिनय शिकवणारी संस्था नसून बालमनावर संस्कार करणारी एक शाळाच ५ ते १४ वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी आयोजित या अभिनय कार्यशाळेत वैदेही चवरे, अभिषेक बेल्लारवार आणि लोकेश (लकी) तांदुळकर यांनी अभिनय व नृत्याचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेतील सहभागी बालकांनी नृत्य सादरीकरणासह संस्कारक्षम प्रहसने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. कल्याणी देव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अभिषेक बेल्लारवार यांनी आभार प्रदर्शन केले. बालरंगभूमी ही केवळ अभिनय शिकवणारी संस्था नसून बालमनावर संस्कार करणारी एक शाळाच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष डॉ. रवींद्र भुसारी, कार्याध्यक्ष रूपाली मोरे, उपाध्यक्ष (उपक्रम) किशोर डाऊ यांच्यासह रोशन नंदवंशी, अमोल निंबार्ते, सुशील सरोदे आणि अर्चना श्रावणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य: रवींद्र भुसारी, संपर्क मित्र