मर्दानी खेळाची विदर्भस्तरीय स्पर्धा ‘निर्णेता-२०२६’ उत्साहात

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नागपूर, 
bharatiya yudhkala spardha ‘nirneta-2026’ शिवशक्ती प्राचीन भारतीय युद्धकला प्रशिक्षण केंद्र आणि क्रीडा भारती महानगरच्या संयुक्त वतीने आयोजित विदर्भस्तरीय पारंपरिक भारतीय युद्धकला स्पर्धा ‘निर्णेता-२०२६’ नुकतीच सुरेश भट सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘प्रवास एका योद्ध्याचा... खेळपट्टीवरील स्वराज्ययोद्धे’ या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत विदर्भातील विविध शाखांमधील सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपले कौशल्य प्रदर्शित केले.
 
 
shiv
 
भारतीय युद्धकलेचा वारसा जतन करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि स्वसंरक्षणाची भावना विकसित करणे या उद्देशाने आयोजित स्पर्धेत लाठी, काठी, तलवार, दांडपट्टा, भाला आदी पारंपरिक युद्धकला प्रकारांचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सकाळच्या सत्रात विविध स्पर्धा पार पडल्या, तर त्यानंतर बक्षीस वितरण व गौरव समारंभ झाला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अतुल गुरू (माजी सदस्य, दुर्ग संवर्धन समिती, महाराष्ट्र शासन), पॅरा ऑलिम्पियन विजय मुनिश्वर, सामाजिक कार्यकर्ते मुन्ना महाजन, शिवकार्यकर्ते, लेखक व गायक नितीन जुनघरे, डॉ. गौरव हिवरे, क्रीडा भारतीचे प्रांत सहमंत्री संतोष साकल्ले तसेच शिवशक्ती आखाड्याचे संस्थापक हितेश डफ उपस्थित होते.
 
 
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच शिवशक्ती प्राचीन भारतीय युद्धकला प्रशिक्षण केंद्रांचे शाखाप्रमुख ओम सोलट (दिघोरी), अभिषेक रंगारी (पारडी), सौरभ देवरकर (फेटरी), प्रणय गुणाकार (जामदारवाडी), अपर्णा कुलकर्णी (जयप्रकाशनगर व अभ्यंकरनगर), प्रदीप मानकर (भगवाननगर), चेतना सहारे (महाल), नीतेश वरखडे व राहुल पाटील (चिकना), रोहित शिरभात्रे (गोंदिया) आणि संकेत वरले (नंदनवन) यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवशक्ती ढोल-ताशा व ध्वज पथकातील कार्यकर्ते, स्वयंसेवक, निरीक्षक, प्रशिक्षक आणि आयोजन समिती सदस्यांच्या योगदानाचाही गौरव करण्यात आला.