बोरी चंद्रशेखर,
Bridge causing traffic obstruction बोरीजवळील नेरकडे जाणारा रस्त्यावरील अरुंद पूल वाहतुकीसाठी वारवांर बंद होत असतो अडाण नदीच्या पाण्यामुळे पावसाळ्यात हा बंद होत असतो. हा पूल अरुंद आहे वाहतूक बंद झाली की परिसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिक जवळगाव, पिंपरी, दहीफळ, नेर या गावांचा संपर्क तुटतो आणि मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण होते.
या पुलाचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले. पण पूल मात्र लहान आहे. अरुंद पूल उंच किंवा रुंद करण्यात आला नाही. याकडे स्थानिकसह अनेक ग्रामपंचायतींनी पाठपुरावा केला. परंतु यश आले नाही. हा पूल उंच करण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या पुलाकडे संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
खूप जुनी मागणी
पूल अरुंद आणि लहान असून अपघात रोखण्यासाठी देखील बांधकाम अत्यंत महत्वाचे आहे. मुख्य जवळगाव पाचवड पिंपरी नेर गावांना जोडणारा कमी अंतराचा हा रस्ता आहे. बोरीजवळील अनेक गावांची ही जुनी मागणी आहे. सबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.