अनिल कांबळे
नागपूर,
Cab driver सिव्हील लाईन्स येथील रवीभवनमधून बाहेर पडण्याच्या दारासमोरच एका कारमध्ये चालकाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. अपघात कि घातपात याबाबत संभ्रम निर्माण झाला. मात्र, वैद्यकीय अहवालावरुन हृदयविकाराच्या झटक्यामुळे चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी सदर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. रोशन अंबादास गरड (४१) असे मृत चालकाचे नाव आहे.
सदर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्वर मार्गावरील रहिवासी रोशन गरड हे स्विफ्ट डिझायर टॅक्सी कारने कोणालातरी सोडण्यासाठी रविभवन येथे आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ते कारमध्ये चालकाच्या सीटवर बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसले. बराच वेळेपासून कसलीही हालचा होत नसल्याने कोणीतही सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तडक घटनास्थळ गाठत न्यायवैद्यक चमूला पाचारण केले. चमूने नमुने गोळा करत मृत्यूची नोंद करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयोकडे सुपूर्द केला. त्याच्या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.