चंद्रपूर जिल्ह्यातील धरणात अवघा 32.15 टक्के जलसाठा

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
chandrapur-water-storage : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस अधूनमधून हजेरी लावत असल्याने तापमानात काही प्रमाणात घट झाली असली, तरी पार 40 अंश सेल्सिअसच्या जवळपासच खोळंबतो आहे. अद्याप जोरदार पाऊस नसल्याने जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम 9 धरणांमधील एकूण जलसाठा 32.15 टक्क्यावर आला आहे.
 
 
 
k
 
 
 
वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन आणि पाण्याचा वापर वाढल्याने निर्माण झालेली ही स्थिती पावसाने आणखी उशिर केला तर चिंता निर्माण करणारी ठरू शकते. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जावण्याची दाट शक्यता आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या दूसर्‍या आठवड्यापासून ढगाळ वातावरण आहे. काही तालुक्यात वादळ वार्‍यासह मान्सूनपूर्व पाऊसही झाला. मात्र अद्याप दमदार पाऊस नसल्याने वातावरणात उकाडा कायम आहे.
 
 
जिल्ह्यातील एकूण लहान, मोठ्या धरणांमध्ये आजमितीस 102.341 दलघमी (32.15 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच महिन्यात धरणामध्ये 102.057 दलघमी (32.06 टक्के) एवढा पाण्याचा साठा उपलब्ध होता. जिल्ह्यात आसोलामेंढा, घोडाझरी, नलेश्वर, चंदई, चारगाव, लभानसराड, लालनाला, अंमलनाला, पकडीगुड्डम, डोंगरगाव असे मोठे-मध्यम धरण प्रकल्प आहे. या धरणांमध्ये संकल्पित उपयुक्त जलसाठा 318.37 दलघमी एवढा आहे. 15 जूनपर्यंत या 9 प्रकल्पांत 102.341 दलघमी (32.15 टक्के) जलसाठा उपलब्ध आहे. तर चंद्रपूर शहराची तहान भागवणारे आणि महाजेनकोला पाणी पुरवणार्‍या इरई प्रकल्पात 56.688 दलघमी (37.20 टक्के ) जलसाठा आहे.
 
इरईत 37.20 टक्के पाणी
 
 
चंद्रपूरची जलवाहिनी असलेल्या इरई प्रकल्पात 15 जून रोजी 56.688 दलघमी (37.20 टक्के) पाणी आहे. तर आसोलामेंढा प्रकल्पात 27.83 दलघमी (53.18 टक्के), घोडाझरी 7.057 दलघमी (17.08 टक्के), नलेश्वर 2.6367 दलघमी (25.77 टक्के), चंदई 0.00 टक्के, चारगाव 6.064 दलघमी (34.97 टक्के), अंमलनाला 8.353 दलघमी (37.56 टक्के), लभानसराड 0.905 दलघमी (12.31 टक्के), लालनाला 7.999 दलघमी (28.97), पकडीगुड्डम 5.705 दलघमी (48.37 टक्के), डोंगरगाव 5.284 दलघमी (42.47 टक्के) एवढा जलसाठा उपलब्ध आहे.