दिग्रसला आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांना लाभ

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
संजय राठोडांच्या जन्मदिनानिमित्त मोफत शिबिर

दिग्रस, 
Digrasla Health Camp या विभागाचे आमदार, राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवार, 14 जूनला मोफत आरोग्य शिबिराचा तब्बल 2 हजार 560 गरजू रुग्णांनी लाभ घेतला. यवतमाळच्या माँ आरोग्य सेवा समितीद्वारा आयोजित, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने व संजय राठोड यांनी आयोजित केलेल्या उपचार व सुविधांसह मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व मोफत औषध वाटप तथा आरोग्य संकल्प अभियानाला प्रतिसाद मिळाला आहे.
 
 
tapashani
 
सकाळी 9 पासून येथील दिनबाई विद्यालयाच्या प्रांगणात रुग्णांची तपासणी करून त्यांना भोजन करून मोफत रोगनिदान, शस्त्रक्रिया, उपचार व औषध वाटप करण्यात आले. या शिबिरात मेडीसिन, हृदयरोग, नेत्ररोग, सर्जरी, स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचा, बालरोग, कान नाक घसा, श्वसनरोग, मानसिक, न्युरो सर्जन, दंत व मुखरोग, किडनी, कर्करोग शरीरातील विविध आजारांच्या या सर्व तज्ञ डॉक्टर मंडळींनी तपासणी केली. शिबिरस्थळी केवायसी करून आयुष्यमान भारत योजनेचे कार्डसाठी विनामूल्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी भोजन व पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दूरवरून आलेल्या रुग्ण व नातेवाईकांची कोणतीही गैरसोय झाली नाही.
 
 
Digrasla Health Camp  2 हजार रुग्णांच्या तपासणीनंतर पुढील उपचाराची आवश्यकता असलेल्या रुग्णांना त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना तारीख देऊन टप्प्याटप्प्याने पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, रुग्ण व एका नातेवाईकाची सर्व व्यवस्था मोफत करण्यात आहे. या आरोग्य संकल्प अभियानासाठी शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, विद्यार्थी सेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच शिवसेनेचे नगरसेवक-नगरसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.