संस्कारवर्ग शिबिरांचे एकत्रिकरण उत्साहात

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नागपूर,
sanskar varga camps रा.स्व.संघ लोककल्याण समितीच्या वतीने अजनी भागात आयोजित संस्कारवर्ग शिबिरांच्या एकत्रिकरणाचा कार्यक्रम “साऊथ पॉईंट स्कूल” येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतमाता पूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. अजनी भाग संघचालक डॉ. रमाकांतजी कापरे तसेच लोककल्याण समिती विदर्भ प्रांत महिला संयोजिका व नागपूर महानगर महिला संयोजिका प्रणिता जांभोरकर उपस्थित होत्या.

sanskar varga camps
मुलांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या कागदी फुलांच्या पुष्पगुच्छांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. हे स्वागत सुजाता सरागे (महानगर टोली सदस्य) तसेच भाग संयोजिका रतिका काशीमकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या प्रणिता यानी मुलांना 'शामची आई आणि शाम' या विषयावर प्रेरणादायी गोष्ट सांगून मार्गदर्शन केले.
 
यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी विविध नाट्यकृती, नृत्य, संस्कृत श्लोक, बडबडगीते, गीता पठण तसेच पसायदान व कल्याण मंत्र सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता खाऊ वाटपाने करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजनी भाग सेवा चमू व संस्कारवर्ग शिक्षिका यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सौजन्य: रितिका काशिम्कार, संपर्क मित्र