पनीर झाले, औषधे झाली... आता ब्युटी प्रोडक्ट्सवर छापेमारी

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
Tukaram Mundhe राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने बनावट आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांविरोधात सुरू केलेल्या कारवाईला मोठा वेग आला आहे. आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अन्न व औषध प्रशासन (एफडीए) अधिक आक्रमक झाल्याचे चित्र असून, अन्न, औषधे आणि आता सौंदर्यप्रसाधनांच्या क्षेत्रातही धडक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
 

FDA raid Maharashtra cosmetics, fake beauty products seized Mumbai, Tukaram Mundhe FDA crackdown, 
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत एफडीएने दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या तसेच विनापरवाना सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपन्यांवर छापे टाकले आहेत. या कारवाईदरम्यान एकूण ३४ लाख ६१ हजार रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
 
 
साताऱ्यातील कराड Tukaram Mundhe  येथे करण्यात आलेल्या तपासणीत सुमारे २९.४५ लाख रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला. या उत्पादनांवर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांक किंवा उत्पादकाची माहिती अपुरी अथवा पूर्णपणे गायब असल्याचे निदर्शनास आले. काही उत्पादनांवर परवाना क्रमांक असला तरी उत्पादकाचे नाव नसल्याने ग्राहकांची दिशाभूल होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला आहे.मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरातही एफडीएने कारवाई करत ‘ब्रेस्ट एन्लार्ज’, ‘बट एन्हान्समेंट’ आणि ‘फॅट बर्नर’ अशा भ्रामक दावे करणाऱ्या उत्पादनांचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १.२० लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.दरम्यान, कांदिवली पश्चिम येथे करण्यात आलेल्या छाप्यात कोणत्याही वैध परवान्याशिवाय सौंदर्यप्रसाधने आणि काही औषधांचे उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून कच्चा माल, यंत्रसामग्री आणि तयार उत्पादने मिळून सुमारे ३.९६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्या आणि व्यक्तींविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम १९४० अंतर्गत गुन्हे नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांनी आकर्षक जाहिराती किंवा अवास्तव दाव्यांना बळी न पडता अधिकृत आणि प्रमाणित उत्पादनेच खरेदी करावीत, असे आवाहन एफडीएने केले आहे.