सैनिकाच्या पत्नीचे धर्मांतरण करुन आळीपाळीने अत्याचार

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
Sexual Assault ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या पत्नीला जाळ्यात ओढून तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. महिलेचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ काढून धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करुन तिला ब्लॅकमेल करण्यात आले. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. तर एक धर्मगुरु मांत्रिक मध्यप्रदेशात पळून गेला आहे. अय्याज मदारे व आमीन शेख अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

BHF
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनेगाव पोलिस हद्दीतील वर्धा मार्गावरच्या इम्पेरियल ग्रीन हॉटेलमध्ये हा किळसवाणा प्रकार घडला. पीडित २४ वर्षीय महिलेचा पती सैन्य दलात आहे. घरी एकटी राहणाऱ्या महिलेची ओळख आरोपी अय्याज ताज मदारे (२६, रा. ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) याच्याशी होती. अय्याजने विवाहितेला ८ जूनला जमीन खरेदी व्यवहाराच्या बैठकीचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. तो जमीन खरेदी व्यवहारासाठी संपर्कात होता. त्याने रविवारी वर्धा मार्गावरच्या इम्पेरियल ग्रीन हॉटेलमध्ये बोलावले. रात्री विवाहिता वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये गेली असता तिथे सरबतामध्ये तिला गुंगीचे औषध पाजले. विवाहिता बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर अय्याज आणि त्याचा सहकारी आमिन शेख या दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आरोपींनी मोबाईलमध्ये विवाहितेचे फोटो आणि व्हिडिओ काढले. नग्न फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत दोघांनी तिच्यावर Sexual Assault आतापर्यंत अनेकदा अत्याचार केला. रोख आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे एकूण तिच्याकडून तीन लाख ९ हजार रुपये उकळले. दोघांच्या मदतीने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील तामिया येथील मौलानाने तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यास भाग पाडून निकाह लावण्याचाही प्रयत्न केला. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार होत होते. अखेर या सर्व प्रकाराला महिला कंटाळली. तिने स्वतःची सुटका करून घेत सोनेगाव पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. सोनेगाव पोलिसांनी अय्याज मदारे व आमीन शेख या दोघांना अटक केली आहे. तर धर्मगुरु अद्याप फरार आहे.
या प्रकरणी माहिती घेण्यासाठी सोनेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल तसरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, हे विशेष.