भारताच्या तुलनेत अमेरिका किती पटीने महाग?जाणून घ्या आर्थिक तफावत

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
economic disparity आर्थिकदृष्ट्या अमेरिका आणि भारत यांच्या जीवनशैलीचा विचार केला तर दोन्ही देशांमध्ये प्रचंड तफावत दिसून येते. अमेरिकेमधील जीवनशैलीमुळे अनेकांना तिथे जाण्याची उत्सुकता असते. डॉलरमधील पगार आणि उच्च जीवनमान यामुळे भारतातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग अमेरिकेला निवडतो. मात्र या आकर्षणामागेचे वास्तव फार वेगळे आहे, कारण तिथे दैनंदिन आयुष्य टिकवण्यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो.
 

भारत अमेरिका  
 
 
अमेरिकेत सर्वात आधी जाणवणारा खर्च म्हणजे घरभाडे. सामान्य भागांमध्येही एका घराचे मासिक भाडे साधारणतः हजारो डॉलर्सपर्यंत जाते, जे भारतीय रुपयांमध्ये लाखोंमध्ये रूपांतरित होते. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा फक्त निवासव्यवस्थेवर खर्च होतो. भारताच्या तुलनेत हा खर्च इतका जास्त आहे की अनेकांना सुरुवातीला आर्थिक नियोजन पूर्णपणे बदलावे लागते.
दैनंदिन जीवनात किराणा माल आणि अन्नपदार्थांचाही मोठा खर्च येतो. एका लहान कुटुंबाचे मासिक किराणा बिलही मोठ्या प्रमाणात वाढते. दूध, भाज्या, धान्य आणि घरगुती वस्तू भारतापेक्षा अनेक पटींनी महाग असल्याने महिन्याचे बजेट सतत ताणलेले राहते. लहान मुलांसह कुटुंब असेल तर डायपर, बेबी फूड आणि इतर आवश्यक वस्तूंवर अतिरिक्त खर्च करावा लागतो.
वाहतुकीच्या बाबतीतही अमेरिका भारतापेक्षा वेगळी आहे. अनेक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक मर्यादित असल्याने कार असणे गरजेचे ठरते. मात्र कार खरेदीपेक्षा तिचा मासिक खर्च अधिक महत्त्वाचा ठरतो. इंधन, विमा, देखभाल आणि ईएमआय यामुळे दरमहा मोठी रक्कम खर्च होते. त्यामुळे वाहन असणे ही गरज असली तरी ती आर्थिकदृष्ट्या महागडी बाब ठरते.
पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधांचा खर्चही भारताच्या तुलनेत जास्त आहे. ज्या सुविधा भारतात तुलनेने स्वस्त मानल्या जातात, त्या अमेरिकेत अनेक पटींनी महाग मिळतात. यामुळे एकूण जीवनशैलीचा खर्च २ ते ३ पट किंवा काही ठिकाणी त्याहूनही अधिक वाढतो.
जर कोणी पर्यटक म्हणून अमेरिका प्रवास करत असेल तर त्याचा दैनंदिन खर्चही कमी नसतो. साध्या राहण्यापासून ते भोजन आणि स्थानिक प्रवासापर्यंत सर्व गोष्टी महाग पडतात.economic disparity हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील जेवण, मेट्रो किंवा बस प्रवास आणि पर्यटन स्थळांची तिकिटे यासाठी दररोज मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे पर्यटनही बजेटवर अवलंबून राहते.
एकूणच पाहता, अमेरिका ही उच्च उत्पन्न देणारी अर्थव्यवस्था असली तरी तिथला खर्चही तितकाच जास्त आहे. भारताच्या तुलनेत दैनंदिन जीवन जगणे अमेरिकेत अधिक महाग आणि नियोजनाची गरज असलेले ठरते. त्यामुळेच अनेक भारतीयांना तिथे स्थायिक होताना आर्थिक व्यवस्थापन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते.