नवी दिल्ली
indian army transformation भारतीय लष्कराने आपल्या गणवेश नियमांमध्ये मोठे बदल करत अधिक भारतीय संस्कृती आणि ओळख प्रतिबिंबित करणारी नवी ड्रेस कोड प्रणाली लागू केली आहे. ‘आर्मी युनिफॉर्म्स-२०२६’ या १७४ पानी नियमावलीत जवळपास दशकभरातील सर्वात व्यापक बदल करण्यात आले असून ब्रिटिशकालीन अनेक परंपरा, प्रतीके आणि शब्दावली हटवण्यात आली आहे.
indian army transformation या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे अधिकाèयांच्या औपचारिक पोशाखात क्लोज्ड-नेक बंदी जॅकेटचा समावेश. भारतीय ओळख अधिक ठळक करण्याच्या प्रयत्नांचा हा भाग मानला जात असून ब्रिटिशकालीन परंपरांचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने लष्कराचे हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे.
indian army transformation नवीन नियमावलीनुसार अनेक औपचारिक गणवेशांमधून समारंभिक पाऊच बेल्ट काढून टाकण्यात आले आहेत. तसेच परेडदरम्यान निरीक्षण करणाèया अधिकाèयांनी तलवार बाळगण्याची सक्तीही संपुष्टात आणली आहे. लष्कराच्या म्हणण्यांनुसार हे बदल लष्करी परंपरा आणि कार्यक्षमतेचे जतन करताना नियमांचे आधुनिकीकरण करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. नियमावलीत नमूद करण्यात आले आहे की, ब्रिटिशकालीन अवशेष मानल्या जाणाèया काही पद्धतींचा आढावा घेतल्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत जेणेकरून लष्करी परंपरा आधुनिक भारताशी सुसंगत राहतील.
indian army transformation नवा गणवेश
लष्कराने सर्व पदांवरील जवानांसाठी ‘ड्रेस 3बी’ नावाचा नवा हिवाळी गणवेशही सादर केला आहे. या गणवेशात अँगोला शर्ट, बॅटल जॅकेट आणि बेरेट टोपीचा समावेश आहे. याशिवाय अधिकाऱ्यांना आता औपचारिक पोशाख म्हणून बंदगला सूट, लाउंज सूट, कॉम्बिनेशन ड्रेस किंवा टायसह फुलबाह्यांचा शर्ट यांच्यासोबत बंदी जॅकेट परिधान करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. हे जॅकेट साध्या आणि गडद रंगाचे असावे तसेच त्यास अनुरूप औपचारिक पॅन्ट आणि बंद बूट घालणे आवश्यक असेल.
indian army transformation ‘रॉयल’ शब्दही काढला
नवीन नियमावलीत ब्रिटिशकालीन शब्दावली हटवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. अनेक लष्करी संदर्भांमध्ये वापरला जाणारा ‘रॉयल’ हा शब्द अधिकृत वापरातून काढून टाकण्यात आला आहे.