कंगना रणौतचा पारंपरिक पैठणी लूक चर्चेत

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
दिल्ली
Kangana Ranaut अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून आयोजित करण्यात आलेल्या खास स्क्रीनिंग सोहळ्यात तिचा पारंपरिक लूक विशेष चर्चेचा विषय ठरला. या कार्यक्रमात कंगनाने महाराष्ट्राची ओळख असलेली सुंदर पैठणी साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
 

Kangana Ranaut Bharat Bhagya Vidhata movie promotion 
मराठी मुलीची भूमिका साकारणाऱ्या कंगनाचा हा पारंपरिक अवतार चाहत्यांना विशेष भावला. सोनेरी-पिवळ्या रंगाची पैठणी, त्यावर काठावर असलेली मोर आणि फुलांची नक्षी यामुळे तिचा लूक अधिक आकर्षक दिसत होता. यासोबत तिने लाल रंगाचा सिल्क ब्लाऊज परिधान करून पारंपरिक आणि उठावदार असा समतोल साधला.कार्यक्रमासाठी तिने कुंदन चोकर आणि जुळते कानातले घालून दागिन्यांची निवडही पारंपरिक ठेवली. त्याचबरोबर हातातील घड्याळ आणि गोल्डन हिल्समुळे तिच्या लूकला आधुनिकतेची हलकी झलक मिळाली. साधा आणि एलिगंट मेकअप, छोट्या लाल टिकलीसह न्यूड-पिंक लिपस्टिकमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत होता. नेहमीच्या कुरळ्या केसांऐवजी तिने वेगळी हेअरस्टाईल निवडल्याने तिचा संपूर्ण पारंपरिक अंदाज अधिक ठळकपणे समोर आलाKangana Ranaut  .‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट येत्या १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यादरम्यान कामा रुग्णालयात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात कंगना रणौतने अंजली कुलथे या धाडसी मराठी परिचारिकेची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि कंगनाचा अभिनय दोन्हीही प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण करत आहेत.