मित्रावर कटरने वार, पत्नीनेही मारले दगडं

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
समुद्रपूर, 
attack-on-a-friend : पती-पत्नी आणि मित्र तिघेही दुचाकीने प्रवास करीत असताना मित्राने गाडी थांबविण्यास सांगितले. मात्र, गाडी न थांबविल्याने मित्रानेच मित्रावर कटरने वार करून जखमी केले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर पत्नीनेही पतीला दगडाने मारहाण करीत दुचाकीने निघून गेले.
 
 
 
j
 
 
 
ही घटना १४ रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर-जाम मार्गावरील गोविंदपूर फाट्याजवळ घडली. याप्रकरणी तक्रारीवरून अज्जू उर्फ काले रा. बुटीबोरी, हिंगणा आणि पत्नी सिजरायण तुषार कुडमेथे रा. सिद्धार्थनगर बुटीबोरी नागपूर यांच्याविरुद्ध समुद्रपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुषार कुडमेथे (२९) असे जखमीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुषार कुडमेथे, पत्नी सिजरायण तुषार कुडमेथे आणि तुषारचा मित्र अज्जू उर्फ काले हे तिघेही ट्रिपल सिट प्रवास करीत होते. दरम्यान, गोविंदपूर फाट्याजवळ अज्जू काले याने तुषारला दुचाकी थांबव असे म्हटले. मात्र, तुषारने दुचाकी न थांबवली नाही. त्यामुळे तुषार आणि अज्जू यांचा वाद झाला आणि अज्जूने तुषारवर कटरने वार केले. दरम्यान तुषारच्या पत्नीनेही तुषारच्या तोंडावर व गुडघ्यावर दगड हाणला आणि अज्जू आणि तुषारची पत्नी दुचाकीने निघून गेले. तुषारने डायल ११२ वर फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तुषारला समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तुषारच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्जू उर्फ काले आणि सिजरायण कुडमेथे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.