३०० वर्षांनंतर सोमवती अमावस्येला महासंयोग

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
lignment on Somvati Amavasya यंदाची सोमवती अमावस्या धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत विशेष मानली जात आहे. जवळपास ३०० वर्षांनंतर ज्येष्ठ महिन्यातील अधिक मास आणि सोमवती अमावस्या यांचा दुर्मिळ संयोग जुळून आल्याने देशभरातील तीर्थक्षेत्रांवर भाविकांची मोठी गर्दी होत आहे. हरिद्वार, प्रयागराज, अयोध्या आणि अन्य पवित्र स्थळांवर लाखो भक्त स्नान, दान आणि तर्पणासाठी दाखल झाले आहेत.सनातन परंपरेत सोमवती अमावस्या अत्यंत पुण्यदायी मानली जाते. या दिवशी गंगास्नान, पूर्वजांचे स्मरण, तर्पण आणि दानधर्म केल्यास विशेष आध्यात्मिक लाभ मिळतो, अशी श्रद्धा आहे.
 
 
 

charurmas 
अमावस्या हा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो. त्यातच ती सोमवारी आल्यास तिचे धार्मिक महत्त्व अनेकपटींनी वाढते. या दिवशी केलेले श्राद्ध, तर्पण आणि दान पूर्वजांच्या आत्म्यांना शांती प्रदान करते तसेच कुटुंबावर त्यांचे आशीर्वाद राहतात, असे मानले जाते. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करण्यालाही विशेष महत्त्व आहे. भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाला सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ मानले आहे. त्यामुळे या दिवशी पिंपळाला जल अर्पण करणे, दीप लावणे आणि प्रदक्षिणा घालणे शुभ मानले जाते. यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात, घरात सकारात्मकता आणि समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.