'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे प्रेक्षकांसाठी सरप्राइज गिफ्ट

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
मुंबई
Maharashtrachi Hasyajatra schedule दिवसभराचा थकवा, कामाचा ताण आणि रोजच्या धावपळीतून मिळणारा विरंगुळा यावर सध्याच्या काळात सर्वात लोकप्रिय ‘उपचार’ म्हणजे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी ‘हास्यजत्रा’. सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम आता प्रेक्षकांसाठी आणखी मोठ्या आणि धमाकेदार स्वरूपात परत येत असून, वाहिनीने घेतलेल्या नव्या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Maharashtrachi Hasyajatra schedule change 
प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीला आणि कार्यक्रमाला मिळणाऱ्या अफाट प्रतिसादाला प्रतिसाद देत आता हा शो आठवड्यातून केवळ दोन दिवस नव्हे तर चक्क तीन दिवस प्रसारित होणार आहे. या नव्या नियोजनानुसार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ दर सोमवार, मंगळवार आणि बुधवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सलग तीन दिवस हास्याचा धमाका अनुभवता येणार आहे. या नव्या पर्वाची सुरुवात १५ जूनपासून होणार असल्याने प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तणाव कमी करण्यासाठी आणि मन हलकं करण्यासाठी हा कार्यक्रम एक महत्त्वाचा आधार बनला आहे. घराघरात पोहोचलेली या कार्यक्रमाची लोकप्रियता केवळ टीव्हीपुरती मर्यादित न राहता सोशल मीडियावरही तुफान चर्चेत असते. विविध विनोदी स्किट्स, पात्रांची खास शैली आणि दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित हलकाफुलका विनोद यामुळे हा शो प्रेक्षकांचा ‘स्ट्रेस बस्टर’ म्हणून ओळखला जातो.
 
 
या कार्यक्रमातMaharashtrachi Hasyajatra schedule  समीर चौगुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव आणि गौरव मोरे यांसारख्या कलाकारांनी आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या अतरंगी भूमिकांमुळे आणि विनोदी टायमिंगमुळे प्रत्येक भागाला वेगळी रंगत मिळते.नव्या बदलानंतर निर्मात्यांनी कार्यक्रमाचा दर्जा आणि मनोरंजनाची पातळी अधिक उंचावण्याचा निर्धार केला आहे. आता प्रत्येक भागात नवे विषय, चालू घडामोडींवर आधारित स्किट्स आणि अधिक सर्जनशील विनोद पाहायला मिळणार आहेत. ‘मनोरंजन होणार मुसळधार’ या संकल्पनेसह येणारे हे नवे पर्व प्रेक्षकांना विनोदाचा ओव्हरडोस देणार असल्याचे स्पष्ट दिसते.या निर्णयामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ही केवळ एक विनोदी मालिका न राहता मराठी मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचा सांस्कृतिक भाग म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.