नागपूर
student felicitation program सर्वसाधारण व आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीत, विशेषतः एकेरी पालक असलेल्या कुटुंबातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान दीपस्तंभ परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सत्कार सोहळ्यात करण्यात आला. आयटी पार्क रोड येथील दत्त मंदिर सभागृहात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या सत्कार सोहळ्यात कठीण परिस्थितीत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फोल्डर फाईल, रजिस्टर व पेन यांसारख्या शैक्षणिक साहित्याचे वितरण करून गौरविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांचा उल्लेख करत आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोन करावे तसेच जबाबदार व जागरूक नागरिक म्हणून देश, समाज आणि पर्यावरणाच्या सेवेत योगदान द्यावे, असे प्रेरणादायी विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी student felicitation program स्पेसवुड कंपनीचे मालक आणि प्रसिद्ध उद्योजक विवेक देशपांडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मोटिवेशनल स्पीकर मंदार अजिंकर, सुप्रसिद्ध लेखिका व ‘देवराई’च्या अध्यक्षा केतकी कानिटकर, माजी नगरसेवक तथा क्रीडा सभापती प्रमोद तभाने, आदर्श शिक्षिका जया गणोरकर, तसेच प्रसिद्ध व्यवसायी अजय कारंडे आणि यशवंत नागदेवते यांची उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवर व सामाजिक कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. किशोर फिरके, सुधाकर शेंडे, प्रदीप बरगट, अमित सिब्बल, सतीश चुटे, ईश्वर चांदेकर, अजय गजभिये, रिखीराम विजयवार, वर्षा कोकाटे, ज्योती नाकतोडे, संगिता पानसे आणि शिल्पा वडोले यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सक्रिय भूमिका बजावली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर मानकर यांनी केले. दीपस्तंभ परिवाराच्या उद्दिष्टांची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हीच संस्थेची प्रमुख भूमिका असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनोद मेहरे यांनी मानले.या प्रेरणादायी सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.