बुलढाणा,
prakash-patil-avchar : परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे हे राजकीय दबावातून आणि वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित असल्याचे सांगत जिल्हा काँग्रेस कमिटीने १५ जून सोमवार रोजी बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील अवचार म्हणाले की, राहुलभाऊ बोंद्रे आणि संस्थेच्या विश्वस्तांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. ज्या तक्रारदारांच्या तक्रारीवरून ही कारवाई झाली त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे खंडणीचे आरोप झालेले आहेत. संस्थेच्या अध्यक्षांशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून आणि राजकीय आकसापोटी ही तक्रार करण्यात आली आहे. हे खोटे गुन्हे तात्काळ रद्द न झाल्यास काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,असा इशाराही त्यांनी दिला.
जयस्तंभ चौकातून निघालेला मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात आले. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर दाखल करण्यात आलेले खोटे, राजकीय व वैयक्तिक सूडबुद्धीने प्रेरित गुन्हे तात्काळ रद्द करावेत. तसेच शासनाची दिशाभूल करणार्या खंडणीखोर तक्रारदारांवर तसेच संबंधित अधिकारी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले की, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेली परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था गेल्या ३३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे काम करत आहे. अशा संस्थेच्या विश्वस्तांवर कोणतीही निष्पक्ष चौकशी न करता दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक आहेत. शासन, पोलीस प्रशासन आणि न्यायव्यवस्थेची दिशाभूल करणार्या खंडणीखोर तक्रारदारांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करावी, तसेच बनावट अहवाल तयार करणार्या संबंधित अधिकारी आणि कर्मचार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. यावेळी प्रकाश पाटील अवचार, अॅड. हरिश रावळ, रशिदखा जमादार, दत्ता काकस, देवानंद पवार, अतिक उर रहिमान जवारीवाले, भूषण मापारी, डॉ. मोहमद इसरार, समाधान सुपेकर, भाई प्रदीप अंभोरे, रिजवान सौदागर, शेख समद, आश्रु फुके, अॅड. भाऊराव भालेराव, विश्वदिप पडोळ, शिवराज पाटील, दीपक देशमाने, प्रमोद महाले, समाधान आकाळ, प्रदीप हाके, प्रभाकर वाघ, डॉ. अमोल लहाने, बाजीराव पाटील, मलिक जमदार, प्रमोद महाले, पवन इंगळे, रविअन्ना काळे, राहुल व्यवहारे, व्यक्तेश रिंढे,यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.