त्या 16 नगरसेवकांची धानोरकर गटाच्या बैठकीला उपस्थिती

* व्हिप झुगारून वडेट्टीवार गटाच्या बैठकीला राहिले होते गैरहजर * गटनेता राजेश अडूर यांच्याविरुध्द अविश्वासाचा संकेत

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
चंद्रपूर, 
dhanorkar-factions-meeting : महानगरपालिकेत आ. विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर गटातील अंतर्गत संघर्ष पेटला आहे. वडेट्टीवार गटाचे विद्यमान गटनेता राजेश अडूर यांना बाद करण्याच्या हालचाली धानोकर गटाने चालवल्या आहे. त्यामुळे अडूर यांनी रविवारी बैठक बोलावली. त्या बैठकीला काँगे्रसचे 27 पैकी केवळ 11 नगरसेवक हजर होते. 16 नगसेवकांनी गटनेत्याचा व्हिप झुगारला. तर याच 16 नगरसेवकांनी मंगळवारी धानोरकर गटाच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. यावरून अडूर यांच्याविरुध्दच्या अविश्वासाचा संकेत स्पष्ट झाला आहे.
 
 
k
 
गैरहजर राहिलेल्या 16 नगरसेवकांवर पक्षशिस्तभंगाची कारवाई करीत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे धाव घेणार असल्याचा इशारा गटनेता राजेश अडूर यांनी दिला आहे. तर दुसरीकडे, धानोरकर गटाने मंगळवारी, बोलावलेल्या बैठकीला 27 पैकी 16 नगसेवक कुठलीही भिती न बाळगता उपस्थित राहिले. या बैठकीत अडूर यांना गटनेता पदावरून काढावे असा सूर असून, तसे पत्र आयुक्तांना देणार असल्याचे कळते.
 
यांनी मारली होती अडूरच्या बैठकीला दांडी
 
 
अजय बल्की, संगीता भोयर, सईदा शेख, रामनरेश यादव, सुनंदा थोबे, सुरेंद्र अडबाले, वैशाली महाडोळे, राहुल घोटेकर, राहुल चौधरी, करुणा चालखुरे, संगिता अमृतकर, सुनील खंडेलवाल, आकाश मानकर, महानंदा वाळके, शिला सिडाम, वनश्री मेश्राम या नगरसेवकांनी सभेला दांडी मारली होती. हेच नगरसेवक मंगळवारी धानोरकर गटाच्या बैठकीला हजर होते.
 
धानोरकर गटाची बैठक असंवैधानिकः राजेश अडूर
 

k
 
मी, आयोजित केलेल्या बैठकीला सचिन कात्याल, वसंत देशमुख, चंदाताई वैरागडे, विनोद लाभाने, वैशाली चंदनखेडे, अभिषेक डोहोफोडे, अनिता चोखे, करिश्मा जंगम आणि सफिया तवंगार खान हे नगरसेवक प्रत्यक्ष उपस्थित होते. तर नगरसेविका संजीवनी वासेकर यांनी दूरदुष्यप्रणालीद्वारे हजर होत्या. या बैठकीस अनुपस्थित राहिलेल्या 16 नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. धानोरकर गटाची बैठक असंवैधानिक आहे, असे मत गटनेता राजेश अडूर यांनी म्हटले आहे.