राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत वृक्षारोपण

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
वणी, 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष Raj Thackeray राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वणी शहर व परिसरात मनसेच्या वतीने वृक्षारोपणाचा पर्यावरणपूरक उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात या मोहिमेत शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली.
 

raj 
 
झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाèयांनी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनसे पदाधिकाèयांनी सांगितले की, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांसाठी स्वच्छ व निरोगी पर्यावरण निर्माण करण्यासाठी वृक्षलागवड अत्यावश्यक आहे.
मात्र, केवळ झाडे लावून जबाबदारी संपत नाही, तर त्या रोपट्यांचे संगोपन करून त्यांना मोठे होईपर्यंत जपणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे सैनिकांनी हाच संकल्प केला असल्याचे त्यांनी नमूद केले.
या उपक्रमादरम्यान विविध प्रकारच्या सावली देणाèया व पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे, लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही कार्यकर्त्यांनी स्वतःहून स्वीकारली असून नियमित पाणीपुरवठा व संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च व फ्लेक्सबाजी टाळून समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा उपक्रम राबवल्याबद्दल मनसेच्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या वृक्षारोपण मोहिमेमुळे वणी परिसरातील हिरवाई वाढण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला आहे.