आ. बकाने यांच्या हस्ते दोन कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
देवळी,
rajesh-bakane : शहराच्या प्रभाग ५ च्या विकासाला गती देणार्‍या तब्बल दोन कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. राजेश बकाने यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, नगरसेवक संतोष भोयर, मंगला पिंपळकर, निलेश कसणारे, दिनेश क्षीरसागर,विष्णू कापसे, गजानन वाणी, आदी उपस्थित होते.
 
 

jkl 
 
 
 
प्रभागातील बकाने लेआऊटमध्ये १० सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यासोबतच चिंतामणी लेआऊटमधील ओपन स्पेससाठी संरक्षक भिंत, तीन ठिकाणी अत्याधुनिक ओपन जिम, हायमास्ट दिव्यांची उभारणी तसेच नाली बांधकामाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे परिसरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठा दिलासा मिळणार आहे.
 
 
विशेष म्हणजे प्रभाग ५ मध्ये एकाच वेळी तब्बल दोन कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामांना प्रारंभ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्याने तयार होणार्‍या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार असून ट्री-गार्डसह वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रभागातील रस्ते केवळ सुस्थितीतच नव्हे तर आकर्षक आणि पर्यावरणपूरक बनणार आहेत.
 
 
यावेळी आ. बकाने यांनी प्रभागातील विकासकामांचा वेग कायम ठेवण्याचा निर्धार व्यत करत दुसर्‍या टप्प्यात उर्वरित भागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यात येतील असे सांगितले.