शशिकांत तोटे यांना ‘रक्तभूषण पुरस्कार’

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
दारव्हा, 
'Raktabhushan Award' for Shashikant Tote येथील नियमित रक्तदाते शशिकांत मधुकर तोटे यांचा ‘रक्तभूषण पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने यवतमाळ येथील धैर्य सोशल वेल्फेअर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना रक्तभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
shashikant
 
शशिकांत तोटे हे 2006 पासून रक्तदानासारखे मानवतावादी कार्य नियमित करत आहेत. याशिवाय आपल्या लेखणीतून रक्तदान जागृती करीत असतात. त्यांनी आतापर्यंत 43 वेळा रक्तदान करून अनेक रुग्णांची गरज भागवली आहे. त्यांचे मानवतावादी कार्य व सामाजिक योगदान बघून रक्तदाता सन्मान सोहळ्यात आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले, समाजसेवक भाई अमन, कमलेश बघेल, सारिका शहा यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.